मुंबई : मुंबईतील आठ लाख ग्राहकांना वीज पुरवठा करणारी भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी टाटा पॉवर, वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर मुंबईची वाढती वीज मागणी पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज झाली आहे.
आंतरिक एआय/एमएल साधनांचा वापर करून, कंपनीने वीज मागणीचे अचूक अंदाज आणि वीज ऑप्टिमायझेशन केले आहे. त्यानुसार, मुंबई शहराची एकूण वीज मागणी ४,५०० मेगावॉटवर पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या वर्षी वीज मागणीचा उच्चांक ४,३०७ मेगावॅट एवढा होता.
कंपनीच्या वितरण नेटवर्कमध्ये, वीज मागणी १,१०० मेगावॉटवर पोहोचेल, जी गेल्या वर्षी १,०६३ मेगावॉट एवढी होती. कंपनी ओष्णिक, हायड्रो, गॅस, सोलर आणि पवन अशा बहुमुखी स्त्रोतांच्या पोर्टफोलिओद्वारे आपल्या ग्राहकांसाठी पुरेशी वीज उपलब्धता सुनिश्चित करत आहे. कंपनीने १,६३० मेगावॉट वीज पुरवठा सुनिश्चित केला आहे. याव्यतिरिक्त, कंपनी अतिरिक्त २०० मेगावॅट वीजनिर्मिती करार करण्याच्या प्रक्रियेत आहे.
तयारीचा भाग म्हणून, कंपनी सर्व ट्रान्सफॉर्मर, फीडर पिलर्स, आणि केबल्सचे थर्मल स्कॅनिंगद्वारे मॉनिटर करत आहे आणि सामान्य ऑपरेटींग पॉइंट्स (NOPs) बदलून लोड ऑप्टिमायझेशन करत आहे. सुरक्षितता आणि ऑटोमेशन उपायांमध्ये सुरक्षित कामाच्या ठिकाणी AI/ML वापरून सीसीटीव्ही फुटेज विश्लेषण समाविष्ट आहे, ज्यामध्ये तेल गळती, हॉटस्पॉट्स, हाऊसकीपिंग आणि घुसखोरांसाठी अलर्ट समाविष्ट आहेत. याव्यतिरिक्त, ऑटोमेशन वाढविण्यासाठी आणि ग्राहकांना जलद पुरवठा पुनर्संचयित करण्यासाठी अत्याधुनिक संवाद तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.
टाटा पॉवर नेहमीच मुंबई शहराला विश्वासार्ह वीजपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी आणि सक्रिय उपाययोजना आणि प्रगत तंत्रज्ञानाद्वारे ग्राहकांना पाठिंबा देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि यापुढेही राहील.