‘आयुक्तांनी कोणाचाही दबाव न बाळगता अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी. शिवसेना त्यांच्या सोबत असेल. फक्त बांधकाम अधिकृत आहे का अनधिकृत याची खातरजमा करावी.' असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
कमला मिल दुर्घटनेच्या एकच दिवस आधी आदित्य ठाकरे कमला मिल इथे गेले होते. यावरुन विरोधकांनी टीकाही केली होती. यालाच आज उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलं. ‘कमला मिल दुर्घटनेआधी आदित्य कमला मिल इथे गेले होते असं सांगता, मग मंत्रालयाला आग लागली होती त्याच्याआधी मुख्यमंत्रीही तिथे होते. त्यामुळे असे आरोप करण्यात काहीही अर्थ नाही.’ असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
दरम्यान, यावेळी त्यांनी भाजपला देखील टोला हाणला. ‘कमला मिल प्रकरणात पब चालकांना पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करावं लागतं हा म्हणजे कहरच झाला. इनाम लावायला ते दहशतवादी आहेत का?, जर पबचे मालक अद्याप सापडत नसतील तर पोलीस खातं नेमकं काय करतंय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
‘कोरेगाव-भीमा घटनेबाबत नंतर बोलेन’
याचवेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना कोरेगाव-भीमा हिंसाचार आणि त्यानंतरच्या महाराष्ट्र बंदबाबत त्यांची प्रतिक्रियाही विचारली. मात्र या संपूर्ण प्रकरणाबाबत आपण आज बोलणार नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, उद्धव ठाकरे मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी आज (शनिवार) शिवाजी पार्कवर गेले होते. त्यानंतर शिवसेना भवन येथे डॉ. विजय ढवळे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे हस्ते झाले.
संंबंधित बातम्या :
आयुक्त अजॉय मेहतांची नार्को टेस्ट करण्यात यावी : मनसे
कमला मिलमधील ‘ते’ हॉटेल शंकर महादेवनच्या मुलाचं
‘मी परवाच इथे आलो होतो, तेव्हाच आगीची भीती व्यक्त केली होती’
कमला मिल घटनेदिवशी माझ्यावर नेत्यांकडून दबाव : बीएमसी आयुक्त
'मोजोस बिस्ट्रो मधल्या शेगडीमुळेच कमला मिल्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव'