मुंबई: भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये युतीबाबतच्या बैठकीतून सध्या तरी काही निष्पन्न झालेलं नाही. एकीकडे युतीसंदर्भात चर्चा करायची आणि दुसरीकडे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर आगपाखड करायची. हा सगळा ड्रामा सुरू असताना सामान्य मुंबईकरांना युतीसंदर्भात नेमकं काय वाटतं? हे जाणून घेण्याचा एबीपी माझानं प्रयत्न केला आहे.


मुंबईकरांना नेमकी युती हवीय की नको यासंदर्भात एबीपी माझानं नेट सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये मुंबईकरांचा कौल युतीच्या विरोधात असल्याचं समजतं आहे. युती करु नये असं नेटीझन्सना वाटतं.

दरम्यान, यासोबतच इतरही प्रश्नांचे नेटीझन्सनं आपली मतं व्यक्त केली आहेत.

1. मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?



2. युतीच्या मुद्द्यावरुन कोण कोणाला खेळवतंय, असं वाटतं?



3. भाजप आग्रही असलेला पारदर्शकतेचा मुद्दा योग्य आहे का?



4. भाजप नेत्यांवर 'सामना'मधून होत असलेली टीका योग्य आहे का?



5. आता शिवसेनेने मनसेशी युती करावी का?



संबंधित बातम्या:
एबीपी माझा सर्व्हे : मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप युती व्हावी का?