मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला सुप्रीम कोर्टाने चांगलाच दणका दिला आहे. मुंबईतील दाऊदची संपत्ती जप्त करण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने सरकारला दिली आहे.


दाऊदची दिवंगत आई अमीना आणि बहिण हसीनाच्या नावाने दाखल करण्यात आलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. नागपाडामध्ये दाऊदची कोट्यावधीची संपत्ती आहे. पण ही संपत्ती हसीना आणि अमीना यांच्या नावावर आहे. दोघीही आता ह्यात नाहीत. पण ही संपत्ती दाऊदने बेकायदेशीरपणे गोळा केल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं होतं.

२००२ ते २००५ दरम्यान दाऊदची संपत्ती जप्त करण्यात आली होती. १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटानंतर दाऊदला फरार घोषित करण्यात आलं होतं. त्यानंतर संबंधित विभागांनी त्याची संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईला सुरुवात केली होती.