मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या सिटी को-ऑपरेटिव्ह बँक सारस्वत बँकेत विलिनीकरण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. यासाठीच आज शिवसेना खासदार आणि सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष आनंदराव अडसूळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. यावेळी सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर हेही उपस्थित होते.


शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी जवळपास एक तास अडसूळ, गौतम ठाकूर आणि पवारांमध्ये चर्चा झाली.

कुठलीही राजकीय चर्चा नसून हजारो खातेदारांना दिलासा देण्यासाठी शरद पवारांकडे मदतीसाठी आल्याचे अडसूळ यांनी स्पष्ट केले. पक्ष अभिनिवेश बाजूला ठेऊन पवार मदतीसाठी कायम धावून येत असल्याचेही अडसूळ यांनी नमूद केले.

सिटी को-ऑपरेटिव्ह बँक आणि सारस्वत बँक यांच्या विलिनीकरण होते का, पुढे काय निर्णय होतं याकडे खातेदारांसह बँकिंग क्षेत्रातील तज्ञांचं लक्ष्य लागलं आहे. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेतील घोटाळ्यामुळे रिझर्व्ह बँकेने टाच आणली आहे. ठेवीदारांना पुढच्या सहा महिन्यात 1 हजारापेक्षा जास्तीची रक्कम काढण्यास मनाई केली आहे.