काही दिवसांपूर्वीच महापालिकेने या इमारतीतील 154 वर्ष जुनं असलेलं आर्मी कँटीन रेस्टॉरंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले होते. मुंबई सत्र न्यायालयाच्या अगदीच शेजारी असलेली 'एस्प्लनेड मेन्शन' ही इमारत साल 2011 मध्ये मोडकळीस आलेली धोकादायक इमारत म्हणून महापालिकेने घोषित केली होती. तरीही वर्षभरापूर्वीपर्यंत या इमारतीत अनेक वकिलांची कार्यलयं सुरु होती.
काही महिन्यांपूर्वी या इमारतीचा स्लॅब कोसळल्यानंतर जवळपास सर्व वकिलांनी तिथून काढता पाय घेतला. रेस्टॉरंटचा तर अवघ्या काही महिन्यांपूर्वीच आपली कात टाकून चकाचक मेकओव्हर करण्यात आला होता. आपला दुर्दैवाने जर काही दुर्घटना घडली तर उगाच जीवितहानी नको, म्हणून हायकोर्टाने ही इमारत तातडीने रिकामी करुन तिच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. याप्रकरणी 4 जूनला हायकोर्टात सुनावणी होणार आहे.