Sunil Tatkare on Supriya Sule : संसदेत माझा नवरा येत नाही. पण ज्याला उत्साह आहे. त्याने बायको संसदेत गेली की, कॅन्टीनमध्ये बसायचे पर्स घेऊन. संसदेत नोटपॅड लागते पर्स नाही. पर्समधून कोठे पैसे देणार आहात? तिथे नोटपॅड, पेन लागतो, असा टोला शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला होता. सुळेंच्या टीकेला अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी प्रत्युत्तर दिलय. ते मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 


काय म्हणाले सुनील तटकरे?


सुनील तटकरे म्हणाले, कोणाचा नवरा पर्स घेऊन ऊभा असलेला मी पाहीला नाही. वहिनींचे कर्तृत्व कोणी नाकारू शकत नाही. नैराश्यातून हे बोलले जाते. नवऱ्याने भाषण केले तर चालेल का? माझ्या मनात सदानंद सुळे यांच्याबद्दल खूप आदर आहे,कायम राहील. पण कळत नकळत त्यांची तुलना अजितदादांशी  केली गेली. दादांची मेहनत पिंपरी चिंचवड पुणे इथल्या लोकांनी पाहिली आहे. 


महिला प्रतिनिधींचा जाहीर अपमान केला आहे


गेले काही महिने आपण वैचारीक लढाई वैचारीक लढाई आहे. अदृश्य शक्ती असं भान सोडून बोलत आहेत. त्यांनी महिला प्रतिनिधींचा जाहीर अपमान केला आहे. स्वताचे वैगुण्य लपवण्याचा प्रयत्न का केला जात आहे. ठाण्यातले लोक एकेरी बोलू लागले आहेत. पक्षातल्या प्रत्येक प्रक्रियेत दादाला वगळून कोणी विचारच करू शकत नाही. भान ठेऊन बोलावे एवढीच माझी अपेक्षा आहे, असे तटकरे म्हणाले. 


निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात


सुनील तटकरे पुढे बोलताना म्हणाले, आम्ही सज्ज आहोत. निवडणुका केव्हाही जाहीर होऊ शकतात. आमचे सहा विभागीय मेळावे घेण्याचे आम्ही ठरविले आहेत. दादांनी पत्र लिहिल्यामुळे अनेक जण नाराज झालेले दिसून येत आहेत. दादांनी विस्तृत भूमिका मांडली होती. त्याला आठ महिने झाले. सत्य पत्रात लिहिले म्हणून काही लोकांना त्रास झाला.


2014 पासून भाजप बरोबर जायचे ही चर्चा सुरू होती


चार जागा दिल्या असे कोण म्हणते. चार दिवसानंतर जागा वाटप सुरू होईल. त्यानंतर आम्ही आमची इच्छा व्यक्त करू. त्यानंतर हा विषय सुरू होईल. आम्ही आमचे विचार सोडलेले नाहीत. तुम्ही तेवढेच बोलत आहात. विकास करण्याचे मुद्दे आहेत. आज भारत विकसीत देशांच्या यादीत आहे. आम्ही एक भुमिका घेतली आहे. 2014 पासून भाजप बरोबर जायचे ही चर्चा सुरू होती, असेही सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले. 


इतर महत्वाच्या बातम्या 


 काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप हॅटट्रिक करणार का? लातुरातील राजकारणाकडे राज्याचं लक्ष