Antilia bomb scare: अँटिलिया स्फोटकं प्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेने आपल्यावरील बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्याअंतर्गत (युएपीए) लावलेली कलमं रद्द करावी अशी मागणी करणारा अर्ज विशेष एनआयए न्यायालयात दाखल केला आहे. त्यावर न्यायालयानं एनआयएला उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचं पत्र ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी बेवारस सोडण्यात आली होती. काही दिवसांतच त्या गाडीचा मालक मनसूख हिरेनच्या अनाचक मृत्यूप्रकरणी गुन्हे शाखेचे सहायक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वाझे, त्यांचा सहकारी रियाझ काझी आणि पोलीस निरिक्षक सुनील माने यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती. मात्र अँटिलियाजवळील एसयूव्हीमध्ये जिलेटिनच्या कांड्या ठेवण्यात आपला कुठेही संबंध नसल्याचं एनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रात स्पष्ट केल्याचं मानेच्यावतीनं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं. त्यामुळे आता मानेवर युएपीएचे आरोप लावता येणार नसून ते डिफॉल्ट जामीनासाठी पात्र आहेत. कारण, नियमांनुसार, एनआयएला 90 दिवसांमध्ये आरोपपत्र दाखल करण अपेक्षित असल्याचा दावाही मानेच्यावतीनं करण्यात आला. सुनील माने यांच्यासह याप्रकरणी अन्य दहा जणांवर एनआयएकडून आरोपपत्र दाखल केलेलं आहे. त्यापैकी निवृत्त एसीपी प्रदीप शर्मा आणि पोलीस शिपाई विनायक शिंदे यांच्यासह अन्य आरोपींनीही जामिनासाठी अर्ज विशेष एनआयए कोर्टात केला आहे.
- Anil Deshmukh: अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर 14 फेब्रुवारीला सुनावणी
- Maharashtra Bandh Over Lakhimpur : माजी आयपीएस अधिकारी जुलिओ रिबेरो यांच्या याचिकेवर राज्य सरकारला उत्तर देण्याची शेवटची संधी, उच्च न्यायालयाचे निर्देश
- न्यायालयाच्या निर्देशांचे पालन न करणाऱ्यांची यापुढे खैर नाही! मुंबई उच्च न्यायालयाचे खडेबोल
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live