- भारतातील न्यायालयांमध्ये धार्मिक ग्रंथांवर हात ठेवून साक्ष देण्याची परंपरा बंद करावी.
- ‘धार्मिक भावना भडकवणे’, याची निश्चित व्याख्यात तयार करावी.
- घटनेच्या कलम 19 नुसार नास्तिकांना व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य मिळावं.
- 1994 सालच्या आयोगाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याबबत ज्या शिफारशी मांडल्या, त्यांची अंमलबजावणी व्हावी.
मुंबईत नास्तिक मेळावा संपन्न, शेकडो समविचारी एकाच व्यासपीठावर !
एबीपी माझा वेब टीम | 10 Apr 2017 09:04 AM (IST)
मुंबई : वेगवेगळ्या विचारधारांचे नास्तिक पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर एकत्र जमले. निमित्त होतं नास्तिक मेळाव्याचं. शेकडो समविचारी लोकांच्या उपस्थितीत मुंबईत नास्तिकांचा मेळावा पार पडला. जात, धर्म, वंश, पंथ, सांप्रदाय इत्यादी गोष्टींपासून दूर असलेल्या आणि विवेकवादी विचारसरणीच्या लोकांची एकजूट अत्यंत दुर्मीळ गोष्ट असते. एकाच विचारांचे असूनही वेगवेगळ्या विचारधारांमध्ये, संघटनांमध्ये ही मंडळी विखुरलेली असते. मात्र, नास्तिक मेळाव्याच्या निमित्ताने समविचारी लोक एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाली. अंधश्रद्धा निर्मुलन समिती, डाव्या विचारसरणीची मंडळी, विववेकवादी मंडळींनी एकाच व्यासपीठावर एकत्र येत विचारांची देवणा-घेवाण केली. देशात नास्तिकतेबाबत एक सर्वेक्षण केलं गेलं, ज्यामधून अत्यंत मोठी माहिती आणि आकडेवारी समोर आली. या आकडेवारीनुसार, भारतात धर्मानंतर दुसऱ्या क्रमांकवर नास्तिकता आहे. देशात आजच्या घडीला सुमारे 15 टक्के नास्तिकांची संख्या आहे. न्यायालयामध्ये सत्य बोलण्यासाठी धार्मिक ग्रंथाच्या वापराला विरोध, नास्तिकवाद्यांच्या हत्येचा निषेध आणि हत्येच्या घटना रोखण्यासाठी सरकारने पावलं उचलावी, द्वेष पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशा विविध मागण्या नास्तिक मेळाव्याच्या केंद्रस्थानी होत्या. नास्तिक मेळाव्यातील प्रमुख मागण्या :