VIDEO : लोकलबाहेर खांबाला धडकून स्टंटबाज तरुणाचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 04 Nov 2016 08:09 AM (IST)
मुंबई : स्टंटबाजीची नशा चढलेल्या एका तरुणाला लोकलच्या फुटबोर्डवर बसून स्टंट करणं चांगलंच महागात पडलं आहे. लोकलबाहेर लोंबकळताना रेल्वेमार्गावरील विजेच्या खांबाला धडकून तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जशी ट्रेन वेगात निघाली हा तरुण ट्रेनबाहेर झेपावला आणि तेव्हाच बाहेरच्या विजेच्या खांबाला धडकून खाली पडला. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. लोकलच्या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या संख्येत गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. यापैकी अनेकांचा स्वतःच्याच चुकीमुळे जीव गमवावा लागत असल्याचंही समोर आलं आहे. 23 सेकंदांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जीआरपीनं त्याची चौकशी सुरु केली आहे. व्हिडिओत येणारा आवाज ऐकला तर ही लोकल मरिन लाईन्स आणि चर्नीरोड स्थानकाच्या मध्ये असल्याचं समजतं. पाहा व्हिडिओ :