ठाणे: दिवाळी म्हटलं की, फराळ आणि फटाके आलेच. आपण नातेवेईकांच्याकडे जातानाही मिठाई घेऊन जातो. यासाठी ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरने खास दिवाळीसाठी 9 हजार रुपये किलोची मिठाई उपलब्ध करुन दिली आहे.
उंची विदेशी पदार्थ, लाख रुपये किलोचं केशर अशा 9 हजार रुपये किलोची देशातील कदाचित पहिलीच मिठाई असावी. पण इतकी किंमत असूनही तयार केलेली सुमारे 100 किलो मिठाई खवय्यांनी कधीच फस्त केली आहे.
या मिठाईत इराणहून आयात केलेले 4 हजार रु किलोचे पिस्ते, सुमारे 1लाख रु किलोचं केशर आणि या मिळाईला अधिक आकर्षक बनवण्यासाठी मिठाईवर खायच्या सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
प्रशांत कॉर्नर कायमच गोड आणि चमचमीत खाणाऱ्यांसाठी पसंतीच ठिकाणं राहिलं आहे. मात्र या सुवर्ण मिठाईमुळे सोन्याचे खाणार त्याला प्रशांत देणार ही नवी म्हण ठाण्यात रुढ होऊ शकते.