लोकलमधील स्टंटबाजी जीवावर बेतली, एकाचा मृत्यू तर चौघे जखमी
एबीपी माझा वेब टीम | 24 May 2016 02:17 AM (IST)
मुंबई: लोकल ट्रेनमधून स्टंटबाजी करणं चार तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. मुंबईच्या स्टंटबाजी करताना एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४ जण जखमी झाले आहेत. काल रात्री हे अपघात झाले आहेत. यात धक्कादायक बाब म्हणजे जखमींमध्ये हे १२ ते १६ वयोगटातील मुलं आहेत. शमशाद उमर, समीर शेख, अमन शेख अशी जखमी झालेल्या मुलांची नावं आहेत. या सर्व जखमी झालेल्यांवर राजावाडी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. स्टंट करताना मृत्युमुखी पडलेला ३२ वर्षीय इसम असून घाटकोपर ते विक्रोळी दरम्यान स्टंटबाजी करताना ट्रेनमधून पडल्याने त्याचा मृत्यू झाला.