प्रीती मेनन, मनीष भंगाळे, जयेश दवेंवर गुन्हा दाखल होण्यासाठी चौकशी व्हावी, एकनाथ खडसेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
----------------------------------
मुंबई: माहिम-किंग्ज सर्कल दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्यानं हार्बरची अंधेरीच्या दिशेनं येणारी वाहतूक ठप्प
----------------------------------
हेडलाईन्स:
1. मुंबई विद्यापीठ पेपर घोटाळाप्रकरणी दोघांचं निलंबन, तर 138 जणांच्या बदल्या, घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्याचा व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत निर्णय
----------------------------------
2. महाराष्ट्राच्या वीराला श्रीनगरमध्ये सलामी, सिंधुदुर्गातल्या आंबोलीत शहीद पांडुरंग गावडेंचं पार्थिव आज दाखल होणार
----------------------------------
3. रोजच्या ब्रेड, पाव, पिझ्झामध्ये घातक रसायनं, कॅन्सरजन्य पदार्थावर बंदी घालण्याची सेंटर फॉर सायन्सची मागणी
----------------------------------
4. दाऊद फोन कॉलप्रकरणी प्रकाश आंबेडकर एकनाथ खडसेंच्या पाठीशी, आपच्या नेत्यांवरही इतर राजकीय नेत्यांच्या नावाची घोषणा करण्यासाठीही आंबेडकर आग्रही
----------------------------------
5. मुंबईतले वाघ आता संपले, गल्लोगल्ली फक्त सिंह, गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांचा शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा, मेक इन इंडियाच्या कार्यक्रमाकडे सेनेची पाठ
----------------------------------
6. धर्माच्या नावावर कोट्यवधी उधळता, मग शेतकऱ्यांना मदत का नाही, भय्यूजी महाराजांचा उद्विग्न सवाल
----------------------------------
7. अडीच लाख रुपये भरले नसल्यानं रुग्णाला दीड महिने डांबून ठेवलं, नागपुरातील ग्रीनसिटी रुग्णालयातील प्रकार, माझाच्या प्रयत्नानंतर रुग्णाची सुटका
----------------------------------
8. भारत आणि इराण संबंधात नवा अध्याय, चाबहार बंदराबाबत दोन्ही देश करारबद्ध, पाकिस्तासह चीनला धसका
----------------------------------
9. चार वर्षात प्रत्येकाला कन्फर्म तिकीट मिळणार, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंची घोषणा, दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रभूंची माझावर खास मुलाखत
----------------------------------
10. झिम्बाब्वे दौऱ्यातून विराट, धवन, रोहितला विश्रांती, नवख्या खेळाडूंना घेऊन जिंकण्याचं धोनी समोर आव्हान, तर विंडीजविरुद्ध कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात शार्दूल ठाकूरचा समावेश