मुंबई : भाजपनं पुन्हा एकदा शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईतले वाघ संपले असून आता गल्ली गल्लीत फक्त सिंह दिसेल, असं वक्तव्य करुन गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
कर्नाक बंदर चौकात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'मेक इन इंडिया'चं प्रतिक असलेल्या सिंहाचं अनावरण करण्यात आलं. त्यावेळी मेहता यांनी गुजराती भाषेत शिवसेनेला अप्रत्यक्ष टोला लगावला.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यामधील धुसफूस वाढताना दिसते आहे. आधी आशिष शेलार यांचं शिवसेनेविरोधातील वक्तव्य आणि आता प्रकाश मेहता यांचं वक्तव्य. आता प्रकाश मेहता यांच्या वक्तव्यावर शिवसेनेच्या गोटातून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.