मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी मिशन बिगेन अगेन या फेसबुक लाइव्हमध्ये अखेर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षाबाबत महत्वपूर्ण निर्णय घेऊन विद्यार्थी पालकांची चिंता मिटवली. मात्र, या परिक्षेचे गुण सरासरी देणार असले आणि ज्याला श्रेणी, गुण वाढवायचे यासाठी ऐच्छिक परीक्षा घेतली जाणार असली. तरी, अटीकेटीबाबत निर्णय अद्याप स्पष्ट न केल्याने अनेक विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत. नेमकं यामध्ये सुद्धा सरासरी गुण देऊन आपल्याला पदवी मिळणार का? की एटीकेटीच्या परीक्षा पुन्हा घेतल्या जाणार? असे अनेक प्रश्न आता पुढे येतायत.


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परिक्षेबाबत निर्णय घेतल्याने ही परीक्षा देणाऱ्या 8 लाख विद्यार्थ्याचा जीव भांड्यात पडला. या परीक्षेत सरासरी गुण देण्याचा निर्णय आणि ज्यांना गुण वाढवण्यास संधी मिळावी असे वाटत असेल त्यांना ऐच्छिक परीक्षेचा पर्याय देत सुवर्णमध्य साधला गेला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी या निर्णयाचं स्वागत जरी केलं तरी एटीकेटी बाबत अनेकांच्या मनात अजूनही गोंधळ आहे.


शिक्षणमंत्री जरी याबाबत फॉर्म्युला दोन दिवसात कळवू असे म्हणत असले तरी सरासरी देऊन पास करताना एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना कसं पास केलं जाणार? की त्यांच वर्ष वाया जाणार? की त्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागणार? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात आहेत. शिवाय ज्याला ऐच्छिक परीक्षा द्यायची आहे ती जर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये घेतली जात असेल तर पीजीला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याला प्रवेश मिळाल्यावर त्या मार्काचा फायदा कसा होणार? ही बॅच कोरोना ग्रॅडयुएट म्हणून हिणवली जाणार का? असा प्रश्न सुद्धा माजी शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी विचराला आहे.


राज्यातील इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही शैक्षणिक माध्यमांमध्ये मराठी विषय सक्तीचा 


एटिकेटी विद्यार्थ्यांचं काय होणार? 


युजीसीच्या गाईडलाइन्सनुसार एटिकेटी परीक्षा या जुलै महिन्यात नियोजित होत्या. सध्या राज्यातील सर्व विद्यापीठात जवळपास एकूण 40 टक्के विद्यार्थी जर एटीकेटीमध्ये येत असतील तर पुन्हा एकदा 3 लाखाच्या जवळपास विद्यार्थ्यांचा याबाबत स्पष्टता येईपर्यंत संभ्रम हा कायम राहणार आहे. त्यामुळे हिताचा निर्णय घेताना काय फॉर्म्युलाने या विद्यार्थ्यांबाबत निर्णय घेतला जाईल? हे पाहावे लागेल. उच्च व तंत्रशिक्षण विभागात अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या तिढा सोडविताना जरी तात्पुरता सुवर्णमध्य साधण्यास यशस्वी झाल असला तरी एटीकेटी विद्यार्थी शिवाय ऐच्छिक परीक्षा आणि पुढचं विद्यार्थ्याचा शैक्षणिक वर्ष याबाबत निर्णय घेताना शिक्षण तज्ज्ञचा सल्ला घेत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचं एक मोठं आव्हान शिक्षण विभागापुढे असणार आहे.


SCC Result | दहावीचा निकाल जाहीर होण्याचा मार्ग मोकळा; भूगोलाच्या पेपरासाठी सरासरी गुण