मुंबई : परीक्षेसाठी जाताना धावत्या ट्रेनमधून पडल्यामुळे मुंबईत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली आहे. केसी कॉलेजला परीक्षा देण्यासाठी जाताना साठ्ये कॉलेजची विद्यार्थिनी असलेली तेजश्री वैद्य सायन आणि माटुंगा स्टेशन दरम्यान लोकलमधून खाली पडली.
तेजश्री परीक्षेसाठी कॉलेजला जात असताना मध्य रेल्वेवरील सायन आणि माटुंगा स्टेशन दरम्यान ट्रेनमधून खाली पडली. दु्र्दैवाची गोष्ट म्हणजे ती खाली पडली, तिथे गटार होतं. जीआरपीची मदत मिळेपर्यंत बराच वेळ ती तशीच जखमी अवस्थेत गटारात पडून होती.
जीआरपीच्या काही कर्मचाऱ्यांनी तेजश्रीला बाहेर काढलं आणि सायन हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सध्या तिची परिस्थिती गंभीर आहे. तिच्या डोक्याला इजा झाल्यामुळे ती बेशुद्ध आहे.
तेजश्री ही आधी रुईया कॉलेजमध्ये शिकत होती. तिथे पत्रकारितेची पदवी घेतल्यानंतर तिने मास्टर्ससाठी साठ्ये कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे एल्फिस्टन भागात ती नोकरी करत होती. तेजश्री ट्रेनमधून कशी पडली, हे अद्याप अस्पष्ट आहे.
परीक्षेला जाताना लोकलमधून पडून विद्यार्थिनी गंभीर जखमी
अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
19 Apr 2018 09:21 PM (IST)
तेजश्री वैद्य ही विद्यार्थिनी मुंबईत सायन आणि माटुंगा रेल्वे स्टेशन दरम्यान लोकलमधून खाली पडल्यामुळे गंभीर जखमी झाली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -