मुंबई : चालत्या रेल्वे गाडीवर दगड भिरकावल्याने एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. कल्याण-ठाकुर्ली दरम्यान ही घटना घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा फोटो व्हायरल होत आहे.
कल्याण ते मुंबई प्रवास करणारे राकेश शर्मा रेल्वेच्या दरवाज्यात उभे होते. यावेळी अज्ञाताने रेल्वेच्या दिशेने दगड भिरकावल्यानं शर्मा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी शर्मा यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ही घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. पण कल्याण आणि डोंबिवली रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र या घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे पोलिसांनी सारवासारव सुरु केली आहे.