2 हजारच्या नोटेमध्ये काही चुका आहेत? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. जाणून घ्या याबाबतचं व्हायरल सत्य
ही नोट फार सुरक्षित असल्याचं आरबीआयच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. पण दोन हजारच्या नोटेमध्ये चूक आहे. त्याता दोन हजार रुपया असं लिहलं आहे. असं म्हटलं जात आहे. असं म्हटलं जात आहे की, या नोटेवर दोनच्या ऐवजी दो लिहलं आहे.
ही मोठी चूक असल्याचं म्हणून सरकारवर टीका करण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेकडून आम्ही याबाबत सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरबीआयकडून एका दहाच्या नोटेचं चित्र पाठविण्यात आलं. त्यात असं सांगण्यात आलं की, प्रत्येक नोटेमागे 15 भाषा असतात. ज्यामध्ये हिंदी नसतं.
याप्रमाणेच 2 हजारच्या नोटेवर देखील 15 भाषा आहेत. जिथे दोन हजार रुपया लिहलं आहे. या नोटेवर असामी, बंगाली, गुजराती, कन्नड, कोंकणी, मल्याळम, मराठी उर्दू या भाषांमध्ये आहे.
ज्या चुका सांगितल्या जात आहे. त्यातील पहिलं म्हणणं आहे की, दोन हजार रुपया लिहलं आहे. याबाबत देण्यात आलेलं स्पष्टीकरण म्हणजे. दोन हजार रुपया हे कोंकणी भाषेत लिहलं जातं. तसंच मराठीत देखील दोन म्हटलं जातं. त्यामुळे मराठीत दोन हजार रुपये असं लिहलं आहे. म्हणजेच नियमानुसार, या नोटेवर लिहलेलं योग्य आहे.
आमच्या पडताळणीत हे व्हायरल सत्य खरं नसल्याचं समोर आलं आहे.