साकिनाक्यात 3 मुलींना विष पाजून 40 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 12 Nov 2016 08:52 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या साकिनाका परीसरात एका व्यक्तीने आपल्या तीन मुलींना विष पाजून आत्महत्या केली आहे. आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. साकिनाक्याच्या मोहाली व्हिलेजमध्ये हा प्रकार घडला आहे. मंगेश अनेराव या 40 वर्षीय व्यक्तीने सकाळी 6 वाजता आपल्या पत्नी आणि मुलाला मिरारोडला नातेवाईकांकडे पाठवलं. त्यानंतर त्यानं आपल्या एक वर्षाच्या दोन जुळ्या मुली आणि 4 वर्षांच्या मुलीला विष पाजून आत्महत्या केली आहे. सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास अनेराव यांच्या बहिणीनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्यावर हा सारा प्रकार उघड झाला आहे. मालमत्तेच्या वादातून ही घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. साकिनाका पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.