दर महिन्याला चौथ्या मंगळवारी मंत्री परिषद बैठक घेण्याचा निर्णय आघाडी सरकारच्या काळात झाला होता. भाजप सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत केवळ तीन मंत्री परिषदेच्या बैठका झाल्या आहेत. सरकारला चार वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता मंत्री परिषद बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
निवडणूक तोंडावर असताना राज्यमंत्र्यांना सन्मान देण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. मंत्री परिषद बैठक घेऊन राज्यमंत्र्यांना खूश करण्याचा हा प्रयत्न असल्याचं हे बोललं जात आहे.
दरम्यान, घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याचंही काही दिवसांपूर्वीच समोर आलं होतं. त्यादृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व खात्यांचा आढावाही घेतला आहे. त्यामुळे आता या राज्य मंत्री परिषदेच्या बैठकीत काय होतं, त्याकडे लक्ष लागलं आहे.
संबंधित बातमी :