मुंबई : राज्याच्या वैद्यकीय अभ्यासक्रम (मेडिकल) प्रवेशाची सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. यामध्ये 49 हजार 856 विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


कागदपत्रांच्या पडताळणीनंतर गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर पहिल्या सर्वसाधारण यादीमधून 767 विद्यार्थी हे अपात्र ठरवले आहेत. आधीच्या यादीमध्ये 50 हजार 623 एवढी विद्यार्थी संख्या होती. आता हे 49 हजार 856 विद्यार्थी पुढील म्हणजेच निवड यादीसाठी पात्र असणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या डोमिसाईलबाबत गोंधळ पाहायला मिळत होता. त्यात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांनंतर ही सुधारित सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली आहे.

येत्या दोन दिवसात निवड यादीमधील विद्यार्थ्यांना आपापले कॉलेज सांगितलं जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण संचालकांनी दिली.

संबंधित बातमी : परराज्यातील विद्यार्थ्यांकडे तब्बल 400 बनावट डोमिसाईल!