मुंबई : मुंबईतल्या सर्व शिक्षकांची पगार खाती राष्ट्रीयकृत बँकेत असताना, ती 'मुंबै बँके'त काढली जावीत, असा आदेश एका जीआरद्वारे राज्य सरकारने काढला आहे. या अध्यादेशाविरोधात शिक्षकांनी आंदोलन केलं


महत्वाचं म्हणजे भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मुंबै बँक ही आधीच वादात आहे. असे आदेश देऊन सरकार मुंबै बँकेला फायदा पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शिक्षक संघटनांनी केला. याबाबत नाराजी व्यक्त करत शिक्षक संघटनांनी मंगळवारी आझाद मैदानात आंदोलन केलं.

राष्ट्रीयकृत बँकेत खातं उघडण्याचा केंद्र सरकारचा नियम असताना राज्य सरकारनं हा आदेश का काढला, असा प्रश्नही विचारला जात आहे.