Neral-Karjat region : राष्ट्रीय रिअल इस्टेट विकास परिषदेच्या (NAREDCO) प्रगत नेरळ-कर्जतने उचित पायाभूत सुविधांसह परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मंथन अफोर्डेबल सिटी इनिशिएटिव्हचे आयोजन केले होते. NAREDCO प्रगत नेरळ-कर्जत' हा सर्वोच्च रिअल इस्टेट उद्योग संस्थेचा नेरळ-कर्जत अध्याय आहे.


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमात बोलताना म्हणाले की, लोकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलत आहे. ते पुढे म्हणाले, आम्ही नेरळ-कर्जत परिसरात पायाभूत सुविधा, ज्ञानावर आधारित उद्योग आणि संशोधन केंद्रे विकसित करण्याची योजना आखली आहे. या अनुषंगाने राज्य सरकारने विविध पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत. 


फडणवीस यांनी यामधील बहुतांश प्रकल्प 2023 पर्यंत पूर्ण होतील, अशी ग्वाही दिली. सरकार नेरळ-कर्जत, पनवेलला मुंबई 3.0 म्हणून विकसित करण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही ते म्हणाले. यामुळे MMR च्या लोकांना अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल पनवेल-भीमाशंकर महामार्गाचा विकास करून त्याचे मल्टीमॉडल कॉरिडॉरमध्ये रूपांतर करण्यासाठी सादरीकरणही प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे दिली. ते पुढे म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येला अधिक  स्थानिक सेवा देण्यासाठी कल्याण बदलापूरच्या चौपदरीकरणाचा विस्तार कर्जत स्थानकापर्यंत केला जाईल.


यावेळी 'एमएमआरडीए'चे  अतिरिक्त मुख्य सचिव आणि महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी एमएमआरमधील रहिवासी एका चांगल्या काळात जगत असल्याचे सांगितले. मुंबई-ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प आणि मेट्रो प्रकल्प यासारखे अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प एकतर पूर्ण झाले आहेत किंवा पूर्णत्वाच्या टप्प्यावर असल्याचे त्यांनी व्हिडिओ लिंकद्वारे सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या