मुंबई : राज्यात होणारी भाजपची पिछेहाट पाहता, राज्य भाजपने हालचाली वेगवान केल्या आहेत. आगामी विधानपरिषद निवडणूक आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेण्यासाठी राज्य भाजपने आज मॅरेथॉन बैठका आयोजित केल्या आहेत.
पहिली बैठक आज सकाळी 11 वाजता दादरमधील वसंत स्मृती भाजप कार्यालयात होणार आहेत. महाराष्ट्र प्रदेश भाजपच्या पदाधिकाऱ्यांची आणि सर्व जिल्हाध्यक्षांची आज मुंबईत बैठक होणार आहे.
त्यानंतर रात्री मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बंगल्यावर भाजप मंत्र्यांची बैठक होईल.
या बैठकांमध्ये राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पोटनिवडणुका, आगामी विधानपरिषद निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती मिळते आहे.
शिवसेनेने स्वबळाच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता स्वबळच्या चाचपणीसाठी कंबर कसली आहे. एकंदरीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने हालचाली वेगवान केलेल्या आहेत.
नुकत्याच झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणूक आणि गोंदिया-भंडारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला पिछेहाट सहन करावी लागली. पालघरमध्ये विजय मिळाला असला, तरी आधीपेक्षा भाजपची मतं कमी झाली, तसेच गोंदिया-भंडाराची जाग गमवावी लागली. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठका महत्त्वाच्या ठरणार आहेत.
राज्य भाजपच्या आजच्या बैठकांमध्ये नेमके काय होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
पोटनिवडणुकीतील पराभवानंतर भाजपच्या बैठकांवर बैठका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
04 Jun 2018 07:47 AM (IST)
शिवसेनेने स्वबळाच्या घोषणेचा पुनरुच्चार केल्यानंतर, भाजपनेही आता स्वबळच्या चाचपणीसाठी कंबर कसली आहे. एकंदरीत आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने भाजपने हालचाली वेगवान केलेल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -