मुंबई : आगामी मंत्रिमंडळ विस्ताराची खलबतं सुरु झाली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच ‘वर्षा’ बंगल्यावर भाजप कोअर कमिटीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे.
राज्यातील भाजपचे दिग्गज नेते दाखल झाले आहेत. त्यांच्यात महत्त्वपर्ण बैठक सुरु आहे.
बैठकीला कोण कोण नेते उपस्थित?
भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे हे मंत्री आणि नेते ‘वर्षा’ बंगल्यावर दाखल झाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तार, हिवाळी अधिवेशन, जनतेत वाढत असलेल्या विरोधी वातावरणाचं आव्हान यावर या बैठकीत चर्चा होणार आहे.
ठाणे जिल्हापरिषद , राज्यातील पदवीधर मतदार संघाची निवडणूक आणि काही नगरपालिकांच्या पोट निवडणुकीबाबतही आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा होणार आहे.