महाराष्ट्रभरातून डी फार्म आणि बी फार्मचे अनेक विद्यार्थी ऑफलाइन नोंदणीसाठी मुलुंडच्या फार्मसी काऊन्सिल रजिस्टर ऑफिसमध्ये आले होते. नोंदणीसाठी विद्यार्थी रांगेत उभे असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळेच तिथे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच काही विद्यार्थ्यांच्या अंगावर गेट पडल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
मुलुंड पश्चिमेला फार्मसी काऊन्सिल रजिस्टरचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये डी फार्म आणि बी फार्मची ऑनलाइन आणि ऑफलाइन नोंदणी केली जाते. आज ऑफलाइन नोंदणीसाठी पहाटे 3 वाजल्यापासून विदयार्थ्यांची ऑफिसबाहेर गर्दी झाली होती. महाराष्ट्रातून सुमारे दीड हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी या नोंदणीसाठी उपस्थित होते.