ST Strike Update Mumbai Bombay High Court : एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. आज हायकोर्टाच्या निकालाची प्रत जारी करण्यात आली.  कामगारांनी 22 एप्रिल 2022 पर्यंत कामावर रुजू व्हावं, असं कोर्टानं सांगितलं आहे. कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे भावूक झाले. निर्णय ऐकताच त्यांना आनंदाश्रू आवरणं कठिण झाल्याचं पाहायला मिळालं. 


हायकोर्टाच्या निकालातील अत्यंत महत्वाचे मुद्दे


कामावर परतणाऱ्या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये - हायकोर्ट 


संपात भाग घेतला म्हणून महामंडळानं कोणतीही कारवाई करू नये


या कारणासाठी जर कामगारांवर कारवाई आधीच केलेली असेल तर ती रद्द करण्यात यावी


ज्या कामगारांना कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आलेल्या होत्या त्यांनासुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा


महामंडळ यापुढे फौजदारी कारवाई करणार नाही, असा आम्हाला विश्वास आहे - हायकोर्ट


संपाच्या काळात ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आलेल्या त्या कर्मचाऱ्यांना बदल्या रद्द करून संपाआधी ज्या ठिकाणी ते कार्यरत होते तिथेच त्यांचं परत पोस्टिंग करा


कोरोना काळात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केले त्यांना  23 मार्च 2020  ते 31 डिसेंबर 2020 या काळात प्रतिदिन 300 रुपयाचा जाहीर भत्ता तातडीनं द्या


महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्माचाऱ्यांचा थकीत पीएफ कायद्यानुसार दिलेल्या कालावधीत त्वरित अदा द्या


कोविड काळात मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबियांना चार आठवड्यात कायदेशीर भरपाई द्यावी


आम्हाला आशा आहे की, न्यायालयाने घेतलेला निर्णय कामगारही मान्य करतील आणि कामावर परततील


परंतु जे कामगार कामावर रूजू होणार नाही त्यांच्यावर कारवाईस महामंडळाला मुभा


एसटी संपासंदर्भातील सर्व याचिका हायकोर्टानं निकाला काढल्या

 

एसटी संपाविरोधातील महामंडळाच्या याचिकेसह इतर सर्व याचिका हायकोर्टानं निकाली काढल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठनं दिलेल्या 26 पानी निकालाची प्रत शुक्रवारी दुपारी जारी करण्यात आली. हायकोर्टानं दिलेल्या अल्टिमेटमनुसार सर्व कामगारांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं, तोवर कामावर न परतणा-या कामगारांवर कोणतीही कारवाई करू नये. संपात भाग घेतला म्हणून महामंडळानं कोणतीही शिस्तभंगाची कारवाई त्यांच्यावर करू नये. जर या कारणासाठी कामगारांवर कारवाई आधीच काही कारवाई केली असेल तर ती रद्द करण्यात यावी. ज्या कामगारांना यासाठी कारणे दाखवा नोटिसा काढण्यात आल्या होत्या त्यांनासुद्धा कारवाईतून दिलासा देण्यात यावा असे निर्देश देत एसटी महामंडळ यापुढे कोणतीही फौजदारी कारवाई कामगारांवर करणार नाही, असा विश्वास हायकोर्टानं व्यक्त केला आहे.

 

याशिवाय संपाकाळात ज्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करून त्यांना ते संपाआधी ज्या ठिकाणी कार्यरत होते तिथेच त्यांचं पुन्हा पोस्टिंग करावं. कोरोनाकाळात ज्या कर्मचाऱ्यांनी काम केलेलं आहे, त्यांना 23 मार्च 2020  ते 31 डिसेंबर 2020 या काळात प्रतिदिन 300 रुपयांचा जाहीर केलेला भत्ता त्यांना तातडीनं देण्यात यावा. कोविड काळात कर्तव्य बदावताना जीव गमावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना चार आठवड्यात कायदेशीर नुकसानभरपाई द्यावी. तसेच महामंडळातून निवृत्त झालेल्या कर्माचाऱ्यांचा थकीत पीएफ कायद्यानं नेमून दिलेल्या कालावधीत त्वरित अदा करण्याचे निर्देशही महामंडळाला देण्यात आले आहेत.

 

कामगारांना उद्दोशून हायकोर्टानं स्पष्ट केलंय की, आम्हाला आशा आहे न्यायालयानं घेतलेला हा निर्णय कामगारही मान्य करतील आणि आपापल्या कामावर परततील. परंतु जे कामगार कामावर रूजू होणार नाहीत त्यांच्यावर कारवाईची महामंडळाला मुभा राहील. त्यानंतरही जर त्रिसदस्यीय समितीनं सुचवलेल्या उपाययोजनांच्या बाबतीत कामगारांचं समाधान झालेलं नसेल तर योग्य त्या प्राधिकरणाकडे दाद मागण्याचा कायदेशीर पर्याय त्यांच्याकडे उपलब्ध आहे असा सल्ला त्यांना हाकोर्टाकडून देण्यात आला आहे.

आता गुणरत्न सदावर्ते काय भूमिका घेणार?


हायकोर्टाच्या निर्णयानंतर संपकरी कर्मचाऱ्यांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले होते, की न्यायालयाचा सविस्तर निकाल आल्यानंतर भूमिका स्पष्ट करणार. आता सदावर्ते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. 


संबंधित बातम्या


ST Workers Strike : एसटी संपाचा तिढा अखेर सुटला! एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू व्हावे, हायकोर्टाचे आदेश


ST Workers : कोणाच्या नादी न लागता ST कर्मचाऱ्यांनी 22 तारखेपर्यंत कामावर यावं, अन्यथा... : अनिल परब



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha