Nitin Raut Exclusive : राज्यात कोळशाचा साठा हा अत्यंत कमी आहे. कोळशाचा साठा उपलब्ध होत नाही. कोळशाचा साठा उपलब्ध झाला तरी रेल्वेच्या वॅगन मिळत नाही.  गेल्या 2 दिवसापासून लोडशेंडिंग सुरू आहे. ही लोडशेंडिंग कमी करून आम्हाला लोडशेंडिंग मुक्त महाराष्ट्र करायचा आहे, अशी माहिती राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली.  वीज संकटासंदर्भात  नितीन राऊत (Nitin Raut) यांच्या एबीपी माझानं एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. 


कोल मॅनेजमेंट करावं लागेल 


उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, उष्णतेची लाट राज्यात आहे. त्यात उष्णता वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मर फेल होत आहेत. त्यासाठी आम्ही कुलिंग देतोय, पाण्याचा फवारा देतोय. अनेक ठिकाणी ट्रीपिंग होत आहेत. उन्हाळ्यात तर कोळसा लागणारच आहे. शिवाय जूननंतर पावसाळा आहे. त्यासाठी सुद्धा कोळसा लागणार आहे. या सगळ्यात कोल मॅनेजमेंट करावं लागेल, असंही ते म्हणाले.  


आता वीज संकट असताना खाजगी कंपन्यांकडून घ्यावी लागेल


नितीन राऊत म्हणाले की, अतिरिक्त जी वीज हवी आहे ती आता वीज संकट असताना खाजगी कंपन्यांकडून घ्यावी लागेल. आता कोळशाचा तुटवडा आहे. टाटाचा जो मुंद्राला प्लांट आहे. त्यामध्ये जो करार 2007 साली झाला होता तेव्हा साडे तीन रुपयांनी झाला होता. त्यामुळे खरेदी करताना सुद्धा व्हेरियेशन दिसणार आहे. सगळी आपण किंमत काढली तर साडे 5 ते पावणे सहा रुपये दराने पडणार आहे. केंद्राचा बारा रुपये दर आहे. त्यापेक्षा 50% ने आपल्याला खरेदी करता येईल, असं ते म्हणाले. यासाठी त्याला मान्यता मिळावी म्हणून आज कॅबिनेटची बैठक आहे, असं राऊतांनी सांगितलं.


ते म्हणाले की, वीज प्रॉपर सप्लाय करणे हे गरजेचे आहे. त्या ठिकाणी काय लोड आहे त्यानुसार वीज सप्लाय करणे गरजेचे आहे. महागडी वीज घेणे राज्याला परवडणारे नाही.  गेल्या 2 दिवसापासून लोडशेंडिंग सुरू आहे. ही लोड शेंडिंग कमी करून आम्हला लोड शेंडिंग मुक्त महाराष्ट्र करायचा आहे. अनेक ठिकाणी लोडशेडिंग सुरू आहे. 


खाजगी कंपन्यांकडे सुद्धा वीज सध्याच्या घडीला नाही 


ओपन मार्केटमधून वीज खरेदी करावी लागणार आहे. खाजगी कंपन्यांकडे सुद्धा वीज सध्याच्या घडीला नाही.  27300 मेगावॉट च्या दरम्यान सद्यस्थितीत वीज लागते.  28 हजार 500 पर्यंत जाऊ शकतो. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातीव सर्व प्लांट पूर्णपणे सुरु नाहीत.  यामुळे वीज दरवाढ होणार नाही विजेचा दर ठरवणे एम ई आर सी चे काम आहे, असंही ते म्हणाले. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha