मुंबई : राज्य परिवहनचा (एसटी) प्रवास आता महागण्याची शक्यता आहे. इंधनदरवाढ आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा फटका एसटी महामंडळाला बसला आहे. या पार्श्वभूमीवर दरात वाढ करण्याचा प्रस्ताव एसटीने वाहतूक विभागाकडे पाठवल आहे.
एसटी महामंडळाला दरवर्षाला तीन हजार कोटींचं डिझेल लागतं. त्यामुळे एकूण वाढलेल्या खर्चामुळे एसटी महामंडळाचं बजेट कोलमडत आहे. एसटीच्या तिकीट दरात वाढ करण्याचा प्रस्ताव वाहतूक विभागाकडून ठेवण्यात आला असून एसटीच्या संचालक मंडळानं त्याला मान्यताही दिली आहे.
आता हा प्रस्ताव आता राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवण्यात आला आहे. इंधन, वेतन, टायर किंवा एसटीचं साहित्य या गोष्टींमध्ये दरवाढ झाल्यास एसटीच्या तिकीटदरवाढीचा प्रस्ताव ठेवला जातो.
सततच्या पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दरामुळेच एसटीने हा दरवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे या दरवाढीचा भार एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.