मुंबई : सातत्याने घसरण होणाऱ्या भारतीय रुपयाला आजही झटका लागला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया आतापर्यंतच्या निचांकी स्तरावर पोहोचला आहे. बाजार खुलताच एका डॉलरची किंमत 73 रुपये 34 पैशांवर पोहोचली.
सोमवारच्या व्यवसाय सत्रात डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये 43 पैशांनी घसरण होऊन 72.91 या स्तरावर बंद झाला होता.
भारतीय रुपयाने आतापर्यंतच्या निचांक स्तर गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांच्या ऐतिहासिक घसरणीसह 73.34 च्या स्तरावर पोहोचला आहे.
दुसरीकडे शेअर मार्केटमध्ये सुरुवातीच्या सत्रा घसरणीची नोंद झाली. सुरुवातीच्या सत्रात सेन्सेक्समध्ये 156 अंकांनी घसरण होऊन 36,370 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 54 अंकांनी घसरुन 10,954 वर आला.
मागील 10 दिवसात रुपयाची घसरण
— सोमवारी (1 ऑक्टोबर) रुपया 43 पैशांच्या घसरणीसह 72.91 प्रति डॉलरवर बंद झाला.
— शुक्रवारी (28 सप्टेंबर) रुपया 72.48 प्रति डॉलरवर बंद झाला.
— गुरुवारी रुपया (27 सप्टेंबर) 72.59 च्या स्तरावर बंद झाला.
— बुधवारी रुपया (26 सप्टेंबर) 72.61 प्रति डॉलरवर बंद झाला.
— मंगळवारी रुपया (25 सप्टेंबर) 72.69 प्रति डॉलरवर बंद झाला.
— सोमवारी रुपया (24 सप्टेंबर) 43 पैशांच्या घसरणीसह 72.63 प्रति डॉलरच्या स्तरावर बंद झाला.
— शुक्रवारी रुपया (21 सप्टेंबर)72.20 प्रति डॉलरच्या दरावर बंद झाला.
— बुधवारी रुपया (19 सप्टेंबर)72.37 प्रति डॉलर दरावर बंद झाला.
— मंगळवारी रुपया(18 सप्टेंबर) 47 पैशांनी घसरुन 72.98 विक्रमी निचांकी स्तरावर बंद झाला.
— सोमवारी रुपया (17 सप्टेंबर) 70.51 च्या दरावर बंद झाला.
रुपयाची घसरण का?
जगभरातील देशांसोबत व्यापारासाठी सामान्यत: डॉलरची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत डॉलरची मागणी वाढते आणि पुरवठा कमी झाल्याने स्थानिक चलनात घसरण होते. "भारताला कच्च्या तेलाच्या आयातीसाठी जास्त डॉलरची गरज असते. पण नुकतंच तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने डॉलरची मागणीही वाढली. तसंच परदेशी गुंतवणूदारांनी गुंतवणुकीत कपात केल्याने देशामधून डॉलर जाऊ लागला. यामुळे डॉलरचा पुरवठा कमी झाला आहे," असं एन्जल ब्रोकिंगचे चनल विश्लेषक अनुज गुप्ता यांनी सांगितलं.
डॉलरच्या तुलनेत रुपयामध्ये ऐतिहासिक घसरण, रुपया 73 पार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Oct 2018 10:23 AM (IST)
भारतीय रुपयाने आतापर्यंतच्या निचांक स्तर गाठला आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 33 पैशांच्या ऐतिहासिक घसरणीसह 73.34 च्या स्तरावर पोहोचला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -