मुंबई:  आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.


भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती अजून कळू शकलेली नाही.

शेवटचं ट्विट

भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्याची बातमी दुपारी अडीचच्या सुमारास आली. मात्र ही बातमी येण्यापूर्वीच त्यांनी काही ट्विटही केले होते. त्यांच्या @bhaiyujimaharaj  या ट्विटर हॅण्डलवरुन दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी शेवटचं ट्विट करण्यात आलं आहे.

या ट्विटमध्ये त्यांनी मासिक शिवरात्री अर्थात महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

या ट्विटसोबत भय्यू महाराज यांनी संस्कृत वचन असलेला महादेवाचा फोटो ट्विट केला आहे.  या संस्कृत वचनाचा अर्थ खूपच गंभीर आहे.

"जन्म, मृत्यू, वार्धक्य यांनी पीडित असणारा, तसेच कर्म बंधनात अडकलेल्या मला, हे मृत्युंजय महादेवा, मला वाचव. मी तुला शरण आलो आहे", हे संस्कृत वचन असलेले फोटो ट्विट भय्यू महाराज यांनी केलं.



भय्यू महाराज यांचं ट्विट

आज मासिक शिवरात्रि है। यह प्रत्येक माह की कृष्ण पक्ष की चतुर्दशी तिथि को मनाई जाती है। हिन्दू धर्म में इस शिवरात्रि का भी बहुत महत्त्व है। 'शिवरात्रि' भगवान शिव और शक्ति के अभिसरण का विशेष पर्व है।

धार्मिक मान्यता है कि 'मासिक शिवरात्रि' के दिन व्रत आदि करने से भगवान शिव की विशेष कृपा द्वारा कोई भी मुश्किल और असम्भव कार्य पूरे किये जा सकते हैं। 'अमांत पंचांग' के अनुसार माघ मास की 'मासिक शिवरात्रि' को 'महाशिवरात्रि' कहते हैं;



'मासिक शिवरात्रि' को 'महाशिवरात्रि' कहते हैं। दोनों पंचांगों में यह चन्द्र मास की नामाकरण प्रथा है, जो इसे अलग-अलग करती है। मै सभी भक्तगणों को इस पवन दिवस की बधाई एवं शुभकामनाये देता हु.






भय्यू महाराज यांची आत्महत्या

कोण होते भय्यू महाराज?

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता.

भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.

इंदूरमध्ये भय्यू महाराजांचं मुख्यालय आणि आश्रम आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात भय्यू महाराजांचे अनुयायी आहेत. भूमी सुधारणा, पेयजल आणि बालशिक्षण क्षेत्रात त्यांनी काम केले आहे.


संबंधित बातम्या  


भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं  


 नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंत.. सर्वांशी सख्य, भय्यू महाराज कोण होते?