मुंबई : टाटा मुंबई मॅरेथॉन उद्या (21 जानेवारी) होणार असून, शहर सज्ज झालं आहे. यासाठी होणारी गर्दी पाहता खास तयारी करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनानेही स्पेशल लोकल सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


मॅरेथॉनसाठी स्पेशल लोकल

कल्याण स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहाटे 4.41 वाजता सुटणारी लोकल 3 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटीला 4.30 वाजता पोहोचेल.

तर पनवेल स्टेशनहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी पहाटे 4.03 वाजता सुटणारी लोकल 3.10 वाजता सुटेल. ही लोकल सीएसएमटीला 4.30 वाजता पोहोचेल.

टाटा मुंबई मॅरेथॉनचा मार्ग :

  • Marathon Amateure - 42 किमीची मॅरेथॉन असून, सीएसएमटीपासून पहाटे 5:40 वाजता सुरु होऊन हाजी अली, सी-लिंक, बांद्रा या मार्गे वरळी डेअरी करत शेवट सीएसएमटी असेल.

  • Half Marthon - हाफ मॅरेथॉन 21 किलोमीटरची असेल. पहाटे 5:40 ला वरळी डेअरीपासून सुरवात होऊन सी लिंककडून परत वरळी डेअरी, महालक्ष्मी रेस कोर्स, बाबूलनाथ मंदिर ते सीएसएमटी हे शेवट असेल.

  • 10 k Run - ही 10 Km ची रन यावर्षी केली गेली आहे. यामध्ये 10 किमी अंतर स्पर्धकांना धावावे लागेल. यात 6 वाजून 10 मिनिटांनी ही मॅरेथॉन सीएसएमटीवरुन सुरु होईल, जी मारीन ड्राईव्ह करत माफटलाल स्विमिंग क्लबपासून त्याच मार्गे सीएसएमटीपर्यंत असेल.

  • Maathon Elite Race - ही 42 किमीची मॅरेथॉन 7 वाजून 10 मिनिटांनी सीएसएमटीपासून सुरु होईल याचा मार्ग पूर्ण मॅरेथॉन प्रमाणे असेल.

  • Senior Citizens Run - ही मॅरेथॉन जेष्ठ नागरिकांसाठी आहे. यामध्ये 4 किलोमीटर अंतर धावावे लागणार आहे. जी 7 वाजून 25 मिनिटांनी सीएसएमटीपासून सुरु होऊन मेट्रो सिनेमा हे शेवट असेल.

  • Champions with Disability - 1 किमी 500 मीटरची मॅरेथॉन दिव्यांगासाठी असेल, जी 7:45 ला सीएसएमटीला सुरु होऊन MG रोडला संपेन.

  • Dream Run - ड्रीम रनमध्ये 6 किलोमीटर अंतर असेल. या मॅरेथॉनची सुरुवात 8:20 ला सीएसएमटी स्टेशनपासून होऊन मरीन ड्राईव्ह, पारशी जिमखानापासून यूटर्न घेत मेट्रो इनोक्सपर्यंत असेल.