मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी शनिवारी 16 फेब्रुवारी रोजी रात्री 10 वाजून 45 मिनिटांपासून ते रविवारी 17 फेब्रुवारी पहाटे 4.15 पर्यंत विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉक काळात दिवा स्थानकावरील पुलाचे गर्डर टाकण्याचे काम केले जाणार आहे. परिणामी, वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. 17 फेब्रुवारी रोजी रात्री 12 वाजून 20 मिनिटांनी सुटणारी 50119 दिवा-पनवेल पॅसेंजर आणि पहाटे 4.45 वाजताची 50120 पनवेल-दिवा पॅसेंजर या दोन गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

16 फेब्रुवारी रोजी रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी येणारी 50106 सावंतवाडी-दिवा पॅसेंजर गाडी पनवेल स्थानकापर्यंतच चालविण्यात येणार आहे. तर 50105 दिवा-सावंतवाडी पॅसेंजर गाडी रविवारी सकाळी 7.13 वाजता पनवेल स्थानकातून सोडण्यात येणार आहे. ब्लॉकदरम्यान 12134 मँगलोर जंक्शन-सीएसएमटी मुंबई ) एक्स्प्रेसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे ही गाडी 50 मिनिटे उशिराने मुंबईत दाखल होईल.