मुंबई : मुंबईमध्ये ड्रग्सचा नायनाट करणारे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांचा केंद्रीय गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मान करण्यात आला. समीर वानखेडे यांच्यासह भारतातील 152 आणि महाराष्ट्रातील 11 अधिकाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्सची बाजू समोर आली. त्यावेळी एन्ट्री झाली समीर वानखेडे यांची. समीर वानखेडे त्यावेळी डायरेक्ट रेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्समध्ये कार्यरत होते. ड्रग्स प्रकरणाचा तपास करण्यासाठी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोमध्ये त्यांची बदली करण्यात आली. सुशांत सिंग राजपूत प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यामुळे या प्रकरणात सखोल आणि वस्तुस्थिती समोर आणणं एक मोठं आव्हान होतं.
ड्रग्सचे जाळे बॉलीवूडमध्ये कशाप्रकारे पसरलेल आहे. याचा पर्दाफाश करण्याचं काम समीर वानखेडे यांनी केलं. बॉलिवूडमधील बड्या नावांच्या कुठल्याही दबावाला न झुकता समीर वानखेडे यांनी कायद्याचा धडा शिकवला. बॉलीवूडमध्ये ड्रग्स कशा प्रकारे घेतले जातात? ते कोण पुरवतात? आणि कशाप्रकारे पुरवले जातात? या सगळ्यांचा पर्दाफाश समीर वानखेडे यांनी केला.
इतकच नाही तर मुंबईमध्ये जे ड्रग्सचे जाळे पसरले होते. त्याला छाटण्याचं काम सुद्धा चोखपणे बजावलं आणि ड्रग्सपासून होणारे नुकसानाबद्दल लोकांमध्ये जनजागृती केली. ज्यामुळे मुंबईमध्ये आणि विशेष करून तरुणांमध्ये ड्रग्सच्या असलेल्या प्रमाणाला कमी करण्यास मोठा यश आलं.
पाहता-पाहता मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये समीर वानखेडे यांची दहशत इतके झाली की त्यांनी या कारभारापासून स्वतःला लांब ठेवलं आणि ज्यांनी कोणी हा व्यापार सुरू ठेवण्याचे धाडस केलं त्यांना चांगलाच धडा समीर वानखेडे आणि त्यांच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमने शिकवला आणि त्यांच्या याच कारकीर्दीतमुळे गृह विभागाकडून विशेष पदक देऊन सन्मानित करण्यात आलं.
2018 साली केंद्र सरकारकडून या सन्मानाची सुरुवात करण्यात आली. चांगला काम करणाऱ्या पोलिसांचे मनोबल वाढावं आणि इतरांमध्ये एक सकारात्मक निरोप जावा या हेतूने या पदकाची सुरुवात करण्यात आली होती. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव करण्यासाठी हे पदक दिले जातात. जे यावर्षी महाराष्ट्रमधील एकूण अकरा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.