मुंबई: दिवाळीसाठी मध्य रेल्वेने 92 विशेष गाड्या सोडण्याची घोषणा केली आहे. यामध्ये मुंबई-जम्मूतावी, मुंबई-वाराणसी, मुंबई-गया, मुंबई-हाटिया, दादर-सावंतवाडी आणि दादर-रत्नागिरी या मार्गांचा समावेश आहे. यातील 48 गाड्या कोकण मार्गावर चालवण्यात येणार आहेत.

दादर-सावंतवाडी (0113) ही गाडी 21 ते 30 ऑक्टोबरमध्ये रविवार, मंगळवार, शुक्रवारी चालवण्यात येणार असून या गाडीच्या 10 फेऱ्या असतील. ही गाडी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 8 वाजता सावंतवाडीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 0114 सावंतवाडी-दादर गाडी सोमवार, बुधवार, शनिवारी सावंतवाडीहून स. 6.40 वा. सुटून त्याच दिवशी सायं. 4.30 वाजता दादरला पोहोचेल.

दादर-सावंतवाडी (01095/96) ही गाडी 1 ते 30 नोव्हेंबर दरम्यान चालवली जाणार आहे. तिच्या 26 फेऱ्या चालवण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. 01095 ही दादर-सावंतवाडी गाडी रविवार, मंगळवार, शुक्रवारी दादरहून स. 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी सावंतवाडी येथे रात्री आठ वाजता पोहोचेल. 01096 सावंतवाडी-दादर सोमवार, बुधवार आणि शनिवारी सावंतवाडीतून स. 5.30 वाजता सुटून त्याच दिवशी दु. 3.50 वाजता दादरला पोहोचेल.

त्याचप्रमाणे दादर-रत्नागिरी 01089/90 गाडी दर शुक्रवारी चालवण्यात येईल. तिच्या चार फेऱ्या होतील. 01089 ही दादर-रत्नागिरी गाडी 21 ते 28 ऑक्टोबरमध्ये दादरहून रा 9.45 वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी स. 6 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी निघणारी गाडी 22 ते 29 ऑक्टोबरमध्ये दर शनिवारी चालवण्यात येईल. ही गाडी स. 8.40 वाजता रत्नागिरीहून सुटून त्याच दिवशी दु. 3.50 वाजता दादरला पोहोचेल.

दादर-रत्नागिरी (01001) 4 ते 25 नोव्हेंबर या कालावधीत दर शुक्रवारी दादरहून रात्री 9.45 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजता रत्नागिरीला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी 5 ते 26 नोव्हेंबर या काळात प्रत्येक शनिवारी स. 7 वाजता ही गाडी सुटणार असून, ती दुपारी 2.05 वाजता दादरला पोहोचेल.