मुंबई : लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या मजुरांना त्यांच्य गावी पोहोचवण्यासाठी अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून झटत आहे. आतापर्यंत शेकडो परप्रांतीय मजुरांना, कामगारांना सोनूने त्यांच्या घरी पोहोचण्यास मदत केली आहे. आजही सोनूने काही मजुरांच्या प्रवासाची व्यवस्था केली होती. या सर्वांना निरोप देण्यासाठी सोनू स्वत: वांद्रे टर्मिनस येथे पोहोचला होता. मात्र आज त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यपासून रोखण्यात आलं.
सोनू सूदने परंप्रांतीय मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांची उत्तर प्रदेशच्या आजमगड येथे जाण्यासाठी ट्रेनची व्यवस्था केली होती. यावेळी सोनू स्वत: या सर्वांना निरोप देण्यासाठी वांद्रे टर्मिनस येथे आला होता. मात्र त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी नाकारली. सोनू जवळपास 45 मिनिट वांद्रे टर्मिनस येथील आरपीएफच्या ऑफिसमध्ये बसून पोलिसांशी चर्चा करत होता. मात्र तरीही त्याला परवानगी मिळाली नाही. एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर माहिती दिली की, मुंबईच्या विभागीय व्यवस्थापकांकडून सोनूला आज प्लॅटफॉर्मवर न सोडण्याच्या सूचना दिल्या होता.
संजय राऊत यांच्या टीकेनंतर अभिनेता सोनू सूद ‘मातोश्री’वर; वादावर पडदा पडण्याची शक्यता
वांद्रे टर्मिनसमधून बाहेर पडल्यावर सोनूला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी का मिळाली नाही याबाबत विचारलं असता, "यामुळे मला काहीही फरक पडत नाही. की मला प्लॅटफॉर्मवर जाण्याची परवानगी मिळाली की नाही. माझं काम मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवणे आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी येथे आलो होतो", असं सोनूने म्हटलं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेबाबत सोनूला विचारलं असता, सोनूने उत्तर देणं टाळलं. मजुर आणि कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी अनेकांचं सहकार्य मिळत आहे. या सर्वांचा मी आभारी आहे, असं सोनूने म्हटलं. 1 जून रोजी सोनूने ठाण्यातून 2 श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून जवळपास 1000 प्रवाशांची त्यांच्या गावी जाण्याची सोय केली होती. या सर्वांना निरोप देण्यासाठी सोनू स्वत: तिथे हजर झाला होता.
सोनू सूद देवदूत वगैरे नाही, करोडो रुपये येतात कुठून? : संजय राऊत
सामनातून सोनू सूदवर निशाणा
खासदार संजय राऊत यांनी सामनातून सोनूवर निशाना साधला होता. सोनू सूद पडद्यावर आणि रस्त्यावरही उत्तम अभिनय करतो. कारण पडद्यामागचे राजकीय दिग्दर्शक तितकेच कसलेले होते. यामागे भाजपची चाल असून सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते, असं संजय राऊतांनी म्हटलं होतं. सामनातील टीकेनंतर काल (रविवार) रात्री सोनू सूदने मातोश्रीवर जाऊन मुख्य़मंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यंटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली होती.
Sonu Sood Special Report | सोनू सूदच्या मदतकार्यावरून भाजप-शिवसेनेत 'सामना'