नवी मुंबई: दारुड्या पित्याच्या त्रासाला कंटाळून झालेल्या वादामध्ये मुलाकडूनच पित्याची हत्या झाली आहे. नवी मुंबईच्या घणसोली गावात हा प्रकार घडला. सागर चासकर असं या आरोपीचं नाव असून त्याला रबाळे पोलिसांनी अटक केली आहे.

 

दशरथ चासकर यांना दारु पिण्याचं व्यसन होतं. लोकांकडून पैसे उसने घेऊन ते दारु प्यायचे. देणेकरी घरी येऊन पैसे मागू लागल्याने दशरथ आणि त्यांचा मुलगा सागरमध्ये वाद झाला. या वादात सागरने दशरथ यांना धक्का दिल्याने ते जमिनीवर पडले. यावेळी त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला.

 

आता याप्रकरणी सागरविरोधात पित्याच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सागर हा ड्रायव्हरचे काम करतो.