मुंबई : रेल्वेच्या कर्मचाऱ्यांकडून काळ्याचं पांढरं केलं जात असल्याचं उघड झालं आहे. मध्य रेल्वेच्या व्हिजिलंस डिपार्टमेंटचं पत्र 'माझा'च्या हाती लागलं आहे. या पत्रात कर्मचाऱ्यांकडून जुन्या आणि नव्या नोटांचा व्यवस्थित हिशोब होत नसल्याचं म्हटलं आहे.
पीआरएस, बूकिंग ऑफिस, पार्सल ऑफिस आणि कॅश ऑफिस मधील कर्मचारी अफरातफर करून जुन्या आणि नव्या नोटांचा व्यवस्थित हिशोब ठेवत नसल्याचं पत्रात म्हटलं आहे.
एवढंच नाही तर काही कर्मचाऱ्यांनी अनधिकृतपणे पैसे बदलून घेतल्याच्या घटना देखील झाल्याचा उल्लेख पत्रात केला आहे. हे पत्र मुंबई, पुणे, भुसावळ, सोलापूर, नागपूर येथील डीआरएम यांना पाठवण्यात आलं आहे.