मुंबई : मुंबईच्या बेभान पावसाने अगदी होत्याचं नव्हत करुन सोडलं आहे. मुंबईच्या पावसात अडकलेले काही जण अजूनही आपल्या घरी पोहोचलेले नाहीत.

80 वर्षीय माधव वैद्य सुदैवाने सुखरुप घरी पोहचले आहेत. वैद्य मुलुंड पश्चिमेला पोलिसांना भेटले. ते सुखरुप घरी पोहचले असून कुटुंबीयांकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. माधव वैद्य मंगळवारी सकाळी 9 वाजता मुलुंडहून बोरिवलीला निघाले होते. मात्र त्यांचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना शोधण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन केलं होतं.


बेपत्ता लोकांचा तुम्हाला शोध लागल्यास तात्काळ पोलिसांना कळवा. तसेच तुमच्या नातेवाईक किंवा मित्रमंडळीतील कुणी बेपत्ता असेल तर आम्हाला माहिती द्या. आम्ही फोटोद्वारे त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवू आणि शोध घेण्यास मदत करु.

  • मुलुंडहून बोरिवलीकडे निघालेले 80 वर्षाचे माधव वैद्य मुलुंड पश्चिमेला पोलिसांना भेटले, सुखरुप घरी पोहचले, कुटुंबीयांकडून आभार व्यक्त 

  • बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक आमरापूरकर कालपासून बेपत्ता आहेत. डॉ. आमरापूरकर परळ भागातून बेपत्ता झाले आहेत.

  • मुंबईच्या दहिसर परिसरात कालच्या पावसात दोघेजण वाहून गेले. प्रतीक घाटले आणि गौरेश अशी या दोघांची नाव आहेत. गौरेशला वाचवण्यात यश आलं आहे. प्रतीक घाटले अद्यापही बेपत्ता आहे.

  • कांदिवलीच्या समत नगरमध्ये महिंद्रा कंपनीजवळच्या नाल्यात ओमप्रकाश निर्मल हा 26 वर्षीय तरुण वाहून गेला आहे. त्याचाही शोध घेतला जात आहे.

  • सुधाकर शंकर कांबळे (५५ वर्ष ) काल संध्याकाळी घाटकोपर बस डेपोमधून ६ वाजता घरी निघाले. मात्र अद्याप ते घरी परतले नाहीत.

  • सँडहर्स्ट रोडचे रहिवासी सुनील वळूज हे काल दुपारी 3 वाजेला बदलापूरहुन घरी जाण्यास निघाले. पण अद्याप ते घरी पोहचले  नाही.



‘एबीपी माझा’चं आवाहन :

मुंबईच्या पावसात तुमच्या कुटुंबियांपैकी किंवा तुमच्या मित्रमंडळींपैकी कोणी हरवलं असेल, तर त्यांचं छायाचित्र majhaphoto@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवा किंवा #माझाचीशोधमोहीम हॅशटॅग वापरुन आम्हाला @abpmajhatv ला टॅग करुन ट्विट करा.

तुमच्या आप्तजनांच्या शोधमोहिमेत, ‘एबीपी माझा’ही तुमच्यासोबत आहे.