मध्य रेल्वेवरील मुलुंड स्थानकावर प्रवास करणाऱ्या नागरिकांनी स्टेशनला नदी-धबधब्याचं स्वरुप आल्याचा अनुभव घेतला. मुलुंडमध्ये चक्क फलाटावरुन पाणी रुळांवर भदाभदा कोसळत होतं.
रेल्वे फलाट, रुळ, फलाटावरचे स्टॉल्स अशा सर्व ठिकाणी फक्त पाणी आणि पाणीच होतं. प्लॅटफॉर्मवरुन हे पाणी रेल्वे ट्रॅकवर पडत होतं. मंगळवारी संध्याकाळी पावणेसहा वाजता हा व्हिडिओ शूट केल्याची माहिती आहे. त्यानंतर मात्र हे पाणी ओसरलं.
मुंबईत बुधवारीही मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावं, अन्यथा असाल तिथे- घरी, ऑफिसमध्ये सुरक्षित रहावं, असं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ :