मुंबई : सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गेल्या काही दिवसांपासून 'स्कल ब्रेकर चॅलेंज' नावाचा एक ट्रेंड सध्या धुमाकूळ घालत असून हा सर्व प्रकार जीवघेणा असाच म्हणाव लागणार आहे. एखादा मुलगा हवेत
उडी मारतो आणि याचवेळी त्याच्यासोबतच उभे असलेले मित्र त्याला पायाने खाली पाडतात. यामुळे संबंधित मुलगा हा जोरात खाली पडतो आणि त्याच्या कमरेला तसेच डोक्याला गंभीर मार लागतो. हे ते चॅलेंज आहे. सध्या फेसबुक आणि व्हॉट्स वर हे व्हिडीओ व्हायरल होत, असून टिक टॉकवर तर अक्षरशः या चॅलेंजने धमाकूळ घातला आहे.


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या चॅलेंजबाबत तंत्रज्ञानविषयक जाणकार शेखर पाटील यांनीही माहिती दिली आहे. शेखर पाटील म्हणाले आहेत की, 'टिकटॉकवर सध्या 'स्कलब्रेकर चॅलेंज' आलेले आहे. यात एक जण मध्यभागी उभा असून त्याच्या दोन्ही बाजूला दोन जण असतात. यातील मध्यभागी उभा असणारा उंच उडी मारतो. तर त्याचे पाय जमीनीवर टेकणार त्याच क्षणाला बाजूला असणारे दोन्ही जण त्याच्या पायाला लाथ मारतात. साहजीकच उडी मारणार्या चा बॅलन्स जाऊन तो खाली कोसळतो. यात खाली कोसळणार्या्ने पाठीवर पडायचे चॅलेंज यात देण्यात आलेले आहे. मात्र हे काम इतके कठीण आहे की, यामुळे बहुतांश जणांच्या पाठीचा कणा आणि डोक्याला गंभीर इजा होण्याचा धोका आहे. मात्र असे असले तरी बरेच तरूण हे चॅलेंज पूर्ण करण्याचा आटापीटा करत असल्याचे दिसून आले आहे. हा ट्रेंड नेमका कुठून आणि कसा सुरू झाला याची माहिती समोर आली नसली तरी यामुळे अनेक विद्यार्थी जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. यात व्हेनेझुएलातील एका विद्यार्थ्याला तर अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. यात सहभागी होणार्यां ना अपंगत्व येण्याचा धोका असून यात त्यांचा प्राणदेखील जाण्याची भिती असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

दरम्यान, ब्लू व्हेल चॅलेंज, कीकी चॅलेंज यांसारखे चॅलेंज टिक टॉकवर व्हायरल झाले होते. त्यानंतर हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अनेकांनी प्रसंगी आपले प्राणही संकटात टाकले होते. सध्या व्हायरल होणारं 'स्कल ब्रेकर चॅलेंज' हे देखील अत्यंत धोकादायक असून यामुळे जीवावरही बेतू शकते. तसेच अनेक मुलांना या चॅलेंजमुळे गंभीर दुखापतही झाली आहे. त्यामुळे अशा व्हायरल होणाऱ्या चॅलेंजेसपासून दूर राहणंच योग्य आहे.

Special Report | TIKTOK and Social Mediaवर रमणाऱ्यांना चाप, औरंगाबादच्या महाविद्यालयात मोबाईल बॅन | ABP Majha