ठाणे : आई-वडील नको असलेल्या मुलांना कचऱ्यात फेकण्याच्या किंवा त्यांच जीव घेण्याच्या घटना आजकाल सर्रास समोर येत आहेत. अशातच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी एक मुलगा आणि दोन मुली असताना चौथी जन्मलेली मुलगी नकोशी झाल्याने भिवंडीतील मातापित्याने दलालांच्या मदतीने तिला विकत असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. दीड लाखांना स्वत:च्या मुलीला विकणाऱ्या क्रूर मात्या-पित्याचा डाव ठाणे पोलिसांनी उधळला आहे. पोलिसांनी याप्रकरणी सहा जणांना बेड्या ठोकल्या असून नवजात बालिकेला डोंबिवलीच्या जननी आशीष चॅरिटेबल ट्रस्टमध्ये ठेवण्यात आले आहे.
सापळा रचत डाव पोलिसांनी डाव उधळला
भिवंडीत राहणारे वकील अन्सारी आणि त्यांची पत्नी मुमताज अन्सारी हिने 4 डिसेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र आधीच एक मुलगा आणि दोन मुली असल्याने चौथी मुलगी नको म्हणून या दोघांनी आपली मुलगी दीड लाख रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी मुमताजची बहीण कायनात खान (30), भाऊ मुझम्मील (18) याच्यासह दलाल झीनत खान, वसीम शेख यांची मदत घेतली. मात्र याचा सुगावा ठाणे गुन्हे शाखेला लागताच अधिकारी आणि अंमलदारांनी बनावट खरेदीदार बनून या बालिकेच्या खरेदीसाठी संपर्क केला. त्यासाठी त्यांना ठाण्यातील पॅसलमिल नाका येथील स्वागत हॉटेल येथे येण्यास सांगितले. ठरल्याप्रमाणे पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हॉटेलमध्ये सापळा रचला. त्यानंतर विक्रीसाठी आलेल्या अन्सारी आणि मुमताजला दीड लाख रुपये देऊन नवजात बालिकेला ताब्यात घेताच पोलिसांनी सर्वांना आपल्या खाक्या दाखवत अटक केली आहे तर तर मुलगी विक्री करत असतानाचे चित्रीकरण सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
- iPhone Smuggling : मुंबई विमानतळावर तस्करी करण्यात येणारे 42.86 कोटी रुपयांचे 3,646 आयफोन्स जप्त, DRI ची कारवाई
- घर सोडण्यास नकार दिल्याने वृद्ध आई-वडिलांना मारहाण, डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार
- पत्नी-मुलाला मारहाण, त्यानंतर संपवलं आयुष्य; खळबळजनक घटनेनं कल्याण हादरलं
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha