डोंबिवली : सध्या आपल्या आसपास अनेक माणूसकीला काळीमा फासणाऱ्या अनेक घटना घडत असतात. माणूसकीच्याच नाही तर रक्ताच्या नात्यांनाही काळीमा फासणाऱ्याी घटना समोर येत असतात. अशीच एक घटना डोंबिवली पश्चिमेतून समोर आली आहे. आधी संपत्तीच्या हव्यासापोटी आई वडिलांना वारंवार घर सोडण्याचा तगादा लावला. मात्र आजारी आई वडिलांनी घर सोडण्यास नकार दिल्याने मुलाने पत्नीसह मिळून वृद्ध आई वडिलांना बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास डोंबिवली विष्णुनगर पोलीस करत आहेत.

Continues below advertisement


आई-वडिल जखमी


डोंबिवली पश्चिमेतील ठाकूरवाडी परिसरात चंद्रकांत ठाकूर हे आपली पत्नी कमल ,मुलगा चेतन आणि सून शिल्पा सोबत राहतात. दरम्यान कमल या किडनीच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान चंद्रकांत ठाकूर यांनी त्यांच्या मालकीची घरे भाडयाने दिली असून त्यांना दरमहा 60 हजार रुपयांपर्यंत भाडं येतं. पण काही महिन्यांपासून त्यांचा मुलगा चेतन आणि सून शिल्पा हे दोघेही त्यांना त्रास देऊ लागले. पण आता चेतन आणि त्याच्या पत्नीने कहरच केला. त्यांनी चंद्रकांत आणि कमल यांना शनिवारी रात्री मारहाण केली. या मारहाणीत चंद्रकांत यांच्या हाताला दुखापत झाली असून कमल यांच्या डोक्यालाही दुखापत झाली आहे. सध्या दोघांवरही डोंबिवलीच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


पोलिसांची कारवाई सुरु


या सर्व प्रकाराबाबत चंद्रकांत यांनी मुलगा चेतन आणि सून शिल्पा हे दोघेही आमच्या मालमत्तेसाठी मागे लागले असून आम्हाला घरात राहू नका, असे सांगत आहेत. त्याच वादातून आम्हाला त्रास देत असून मारहाणही केली आहे. दरम्यान याबाबत जवाब नोंदवन्याचं काम सुरू असून मारहाण करणाऱ्यां विरोधात ठोस कारवाई केली जाईल अस विष्णू नगर पोलिसांनी सांगितलं, पण कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha