मुंबई-ठाण्यातील मुसळधार पावसामध्ये सहा जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2017 01:20 PM (IST)
मुंबई आणि ठाणे परिसरात मंगळवारी झालेल्या जोरदार पावसामुळे साचलेल्या पाण्यात वाहून किंवा तत्सम अपघातांमध्ये सहा जणांचा बळी गेला आहे.
मुंबई : मुंबईत झालेला मुसळधार पाऊस आणि साचलेल्या पाण्यामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये दोन बालकांचा समावेश असल्याची माहिती 'रॉयटर्स'ने दिली आहे. विक्रोळीमध्ये घर कोसळून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 45 वर्षीय महिला आणि दीड वर्षीय बालकाला जीव गमवावा लागला. तर भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाला. ठाण्यामध्ये तीन जण पावसाच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.