भावगीत सम्राट अरुण दातेंंचा मुलगा संगीत यांचं निधन
एबीपी माझा वेब टीम | 05 Oct 2016 12:28 PM (IST)
मुंबई : मराठीतील ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचा मुलगा संगीत दातेंचं निधन झालं आहे. मुंबईतील सायन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी संगीतसृष्टीला भावगीतांनी समृद्ध केलेल्या अरुण दातेंचा मुलगा संगीत काही दिवसांपूर्वी कफल्लक अवस्थेत आढळले होते. पुण्यातील वाकड पुलाखाली संगीत दाते भिकार्याचे जिणं जगत होते. भाऊ आणि वडिलांनी नातं तोडल्याचा दावा संगीत दातेंनी केला होता. संगीत दाते यांच्या निधनाबाबत कळवण्यासाठी नातेवाईकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत होता, परंतु कोणीही उत्तर देत नव्हतं. मात्र काही काळाने पुन्हा संपर्क साधला असता, त्यांचे नातेवाईक संगीत यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहणार असल्याचं कळतं. दरम्यान संगीत यांची बालमैत्रीण, जॉय नागेश भोसले आणि मित्रमंडळी आज दुपारी 4 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहेत.