मुंबईः राज्यभरातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणासंदर्भातील हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपली. या बैठकीत न्यायालयीन लढ्यासाठी रणनीती ठरवण्यात आली.
मराठा आरक्षणासंदर्भात 13 तारखेला हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली.
सरकार मराठयांना आरक्षण देण्यासाठी पॉझिटीव्ह आहे, अशी माहिती शिवसेना नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली
या बैठकीला भाजप नेते विनोद तावडे, चंद्रकांत पाटील, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेस नेते अजित पवार, काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील उपस्थित होते. याशिवाय आरक्षण समितीचे सदस्यही हजर होते.
राज्यभरातील मराठा मोर्चांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.