मुंबई : पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये लढाई रंगणार आहे. कारण, शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी देण्यात आली. वनगा यांनी आज शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
पालघर शहरात शिवसेनेने भाजपाला उत्तर देण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. दुसरीकडे, काँग्रेसचे माजी मंत्री राजेंद्र गावित यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पालघरची उमेदवारी देण्यासाठी राजेंद्र गावित यांचं नाव भाजपच्या संसदीय समितीकडे पाठवलं जाणार आहे.
भाजपचे खासदार चिंतामणराव वनगा यांचं निधन झाल्याने पालघरमध्ये पोटनिवडणूक होत आहे. मात्र भाजपने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत वनगा कुटुंबाने शिवसेनेत प्रवेश केला.
दरम्यान, चिंतामणराव वनगा यांच्या मुलालाच भाजपकडून तिकीट मिळणार होतं, मात्र जे झालं तै दुर्दैवी आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
28 मे रोजी पोटनिवडणूक
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आतापर्यंत 18 उमेदवारांनी अर्ज घेतला आहे. पालघर आणि गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी 28 मे रोजी पोटनिवडणूक होत असून 31 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
संबंधित बातम्या :
वनगांच्या मुलाच्या मेसेजला पाचव्या मिनिटाला मी रिप्लाय केला : मुख्यमंत्री
श्रीनिवास वनगांना वळवण्यासाठी सेना-भाजपच्या चाली
पक्षाने वाऱ्यावर सोडलं, दिवंगत खासदार वनगांच्या कुटुंबियांचा शिवसेनेत प्रवेश
पालघरचे भाजप खासदार चिंतामण वनगा यांचं निधन
पालघर आणि भंडारा गोंदिया लोकसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर