Shraddha Murder Case:   श्रद्धा वालकर हत्या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला आहे. सध्या या प्रकरणाचा वेगाने तपास सुरु असून तपासात अनेक गोष्टी समोर येत आहेत. दुसरीकडे वसईत (Vasai News)राहणारे आफताबचे कुटुंब सध्या नॉट रिचेबल आहे. ते सोसायटीतील सभासद आणि माणिकपूर पोलिसांच्याही संपर्कात नाही. सोसायटीचे सचिव अब्दुल्ला खान यांनी दिलेल्या माहितीनुसार आफताबचं कुटुंब 15 दिवसापूर्वीच दुसरीकडे शिफ्ट झालं आहे आणि एक हप्त्यापूर्वी एक भाडोत्रीही त्या घरात ठेवण्यात आला आहे.  


ज्यादिवशी आफताबच कुटुंब शिफ्ट होणार होतं. त्या रात्री आफताब वसईत आपल्या कुटुंबाला भेटला. यावेळी सोसायटी सचिव अब्दुल्ला यांच्याशीही त्याचं बोलण झालं. आपण दिल्लीला राहत असल्याचं त्यानं त्यांना सांगितलं. आफताबची माणिकपूर पोलिसांनी दोनदा चौकशी केली होती. त्यामुळं आफताबने आपल्या कुटुंबाला सांगितलं असेल का? त्यामुळे कुटुंबांनी अज्ञातस्थळी जाण्याचा निर्णय घेतला असावा का? किंवा पोलिसांचा सुरु असलेल्या ससेमिऱ्याला कंटाळून आफताबच कुटुंब दुसरीकडे शिफ्ट झाले असावे का? असे प्रश्न आता उपस्थित होतं आहेत.  


श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडारने वसई पोलीस ठाण्यात 6 ऑक्टोबर 2022 रोजी श्रद्धाच्या मिसिंगची लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ती तक्रार माणिकपूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आली. माणिकपूर पोलिसांनी आफताबचे फोन ट्रेस करण्यासाठी सुमोटोद्वारे मिसिंग गुन्हा 12 ऑक्टोबर रोजी दाखल केला. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी जबाबासाठी श्रद्धाच्या वडिलांना बोलावून घेतलं होतं. 3 नोव्हेंबर रोजी पहिल्यांदा आफताबला दिल्लीहून बोलावलं आणि तो आला होता. त्यावेळी माणिकपूर पोलिसांनी त्याच्याकडून प्राथमिक माहिती घेतली. 


त्यानं श्रद्धाशी आपलं भांडण झालं असल्याचं सांगून तिच्याशी आपला काहीही संपर्क नसल्याच सांगितलं. त्याच्या बोलण्याच्या कॉन्फिडन्सवरुन पोलिसांनाही संशय आला नाही. त्यानंतर माणिकपूर पोलिसांनी  आफताबला दुसऱ्यांदा माणिकपूर पोलीस ठाण्याला बोलावलं आणि तो आला देखील. त्यावेळी पोलिसांनी त्याचा लेखी जबाब नोंदवला. त्यावेळी पोलिसांच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता.  त्याला श्रद्धाला मारल्याचा आणि तिच्या शरीराचे अवयव कापल्याचा पश्चात्तापही त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. त्यावेळीही त्यांने पोलिसांना श्रद्धाशी भांडण झाल्यावर ती निघून गेल्याचंच सांगितलं होतं.


मात्र त्यावेळी माणिकपूर पोलिसांकडे श्रध्दा आणि आफताबचे मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल,  बॅंकेचे कागदपत्रे, पैशाचं व्यवहार इत्यादीची संपूर्ण माहिती होती आणि आफताबकडे याबद्दल काहीच उत्तर नव्हतं. 


आफताबला श्रद्धाच्या बॅंकेचे आणि मोबाईलचे पासवर्ड माहित होते. श्रद्धाच्या मृत्यूनंतरही आफताबने तिचे एटीएम, क्रेडिट कार्ड आणि त्याच्या बँक खात्यासह डेबिट कार्ड वापरून पैसे काढल्याच निष्पन्न झालं आहे. 18 मे ला श्रद्धाची हत्या केल्यानंतर आफताब श्रद्धाचं सोशल मीडिया अंकाउट चालवत होता. जेणेकरुन प्रत्येकाला श्रद्धा जिंवत असल्याचं वाटेल. श्रद्धाच्या अकाउंटमधून आफताबने 54 हजार रुपये काढल्याची माहिती मिळत आहे. सध्या आफताबने श्रद्धाला ठार मारल्याची कबुली दिली आहे. मात्र 15 दिवसापूर्वी आलेल्या आफताबने आपल्या कुटुंबाला याबाबत कल्पना दिली होती. का हे पाहणं आता औत्सुक्याचं राहणार आहे. 


ही बातमी देखील वाचा


Shraddha Walkar Murder Case : ऑनलाइन ट्रान्झॅक्शन, लोकेशन आणि बेपत्ता झाल्याची तक्रार; 'त्या' 54 हजारांमुळेच झाला आफताबचा पर्दाफाश