मुंबई : मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र, याबाबतच्या निविदा प्रक्रिया रखडल्याने रुग्णालयाचा पुनर्विकास रखडला होता. आज स्थायी समितीच्या बैठकीत याबाबतच्या प्रस्तावाला भाजपने विरोध केला तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि सत्ताधारी शिवसेनेने एकत्र येत प्रस्ताव मंजूर केला. यामुळे अनेक वर्षे रखडलेला सायन रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागला आहे.


1900 खाटांचे रुग्णालय
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय 1900 खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, 20 मजल्यांचं परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, 19 मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, 3 मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी आला होता.


राज्य सरकारने औषध वितरकांचे 97 कोटी थकवले, बिले तातडीने मंजूर न केल्यास हाफकिनबाहेर आंदोलनाचा इशारा


काय आहे नेमका प्रस्ताव
सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालय 1900 खाटांचे केले जाणार आहे. या रुग्णालयाच्या आवारातच वैद्यकीय महाविद्यालय, 20 मजल्याची परिचारिका महाविद्यालय व निवासी अधिकाऱ्यांसाठी निवासस्थान इमारत, 19 मजल्याची कर्मचारी निवासस्थानाची इमारत, 25 मजल्यांची पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह इमारत, 3 मजल्याची तात्पुरता निवारा इमारत बांधली जाणार आहे. त्यासाठी नवी दिल्लीतील अर्कोप व शशांक मेहेंदळे अ‍ॅण्ड असोसिएटसने आराखडे बनवले असून पालिका 737 कोटी रुपये खर्च करणार आहे.


EXCLUSIVE | कोरोनाची दुसरी लाट येणार का? Covid टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांच्याशी बातचीत