मुंबईत एलफिन्स्टन स्टेशनवर लोकलवर झाड पडल्यानं शॉर्टसर्किट
एबीपी माझा वेब टीम | 28 Jun 2017 11:14 PM (IST)
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या एल्फिन्स्टन रेल्वे स्टेशनवर बोरीवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर आज संध्याकाळी झाड पडल्यानं ओव्हरहेड वायरवर शॉर्टसर्किट झालं. त्यामुळे पश्चिम रेल्वेची डाऊन स्लो मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. ही वाहतूक जवळपास 50 मिनिटं खोळंबली होती. दरम्यान संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी वाहतूक विस्कळीत झाल्यानं प्रेक्षकांचे चांगलेच हाल झाले. आज बुधवारी संध्याकाळी साडेसहाच्या दरम्यान झाड पडलं. शॉर्टसर्किट झाल्यानं लोकल जागच्या जागी थांबून होती. आज मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं, तर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. मुसळधार पावसामुळे हार्बर मार्गावरील वाहतूकीचाही खोळंबा झाला होता. ऐन गर्दीच्या वेळी वाहतुकीचा खोळंबा झाल्यानं मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागला. पाहा व्हिडिओ :